शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मुलगा मंत्री झाला, तरीही आईचा एसटीनेच प्रवास...; सोशल मीडियावर कौतुकांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 06:42 IST

अनिल पाटील यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता होते.

-संजय पाटीलअमळनेर (जि. जळगाव) :  रविवारी अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र,  त्यांच्या मातोश्री पुष्पाबाई पाटील यांनी आपला साधेपणा सोडला नाही. एसटी बसने त्या सोमवारी सकाळी अमळनेरहून हिंगोणे (ता. अमळनेर) या गावी शेतात पोहोचल्या. आधीपासूनचा त्यांचा साधेपणा मुलाला पद मिळाल्यानंतरही बदललेला नाही.

अनिल पाटील यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता होते. तेव्हाही घरात चारचाकी आणि आज चार चारचाकी आहे; मात्र अनिल पाटील यांच्या मातोश्री पुष्पाबाई पाटील ह्या नियमितपणे आपल्या मूळ हिंगोणे गावी शेती करायला जातात.  विशेष म्हणजे त्या नेहमी ‘लालपरी’ने गावी जातात आणि परत येतात.  पाटील यांच्या परिवारातील सदस्य सोमवारी मुंबईला रवाना झाले. पुष्पाबाईंनी मात्र सकाळीच बसस्थानकात जाऊन एसटीने हिंगोणे गाठले.

मंत्री अनिल पाटील यांच्या आई आपल्यासोबत बसने प्रवास करत आहेत,  म्हणून वाहक मनोज पाटील यांनी साधेपणाचा हा क्षण आपल्या मोबाइलमध्ये टिपला.  पुष्पाबाईंनी  हिंगोण्यातील ग्रामदेवतेला पेढे वाहिले.  शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे. शरीरात प्राण आहे तोपर्यंत ज्याने-त्याने आपापली कामे करत राहावी, असे सांगून त्यांनी जनतेच्या अपेक्षा वाढल्याने मुलाने त्या पूर्ण कराव्यात आणि कुलदेवतेने त्याला बळ द्यावे, अशी प्रार्थना केल्याचे त्या म्हणाल्या.अनिल पाटील यांच्या वहिनी राजश्री पाटील याही सासूसोबत शेतावर जात असतात. नवनवीन प्रयोग करून शेतीत बदल घडवितात आणि सरपंच या नात्याने गावचा कारभारदेखील सांभाळतात.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव