घराला आग लागली अन् स्वप्नांची राखरांगोळी झाली; रोख रक्कमेसह सर्व वस्तू जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 12:58 IST2022-02-26T12:58:14+5:302022-02-26T12:58:53+5:30

अमळनेरच्या माया गलांडे यांच्या घराला आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.

The house caught fire in Jalgaon Burn all items, including cash | घराला आग लागली अन् स्वप्नांची राखरांगोळी झाली; रोख रक्कमेसह सर्व वस्तू जळून खाक

घराला आग लागली अन् स्वप्नांची राखरांगोळी झाली; रोख रक्कमेसह सर्व वस्तू जळून खाक

जळगाव – आयुष्यभराची पुंजी काही क्षणातच गेली तर किती दु:खं होईल हे कुणालाही शब्दात मांडता येणार नाही. जळगावच्या अमळनेरमध्ये घडलेल्या एका दुर्घटनेमुळे गलांडे कुटुंबीयांच्या वाट्याला हे दु:खं आलं आहे. घरात शॉकसर्किटमुळे आग लागली आणि काही क्षणातच सर्वकाही राख झालं. मिलचाळ परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. या लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

अमळनेरच्या माया गलांडे यांच्या घराला आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. माया गलांडे या हातमजुरी करून उदरनिर्वाह करतात. या घटनेमुळं त्यांचा संसार आला उघड्यावर पडला आहे. पै-पै जमवून ठेवलेली रोकडही आगीत जळून राख झाली. घरातील कपाट, फ्रीज, कपडे, भांडी सर्व काही आगीत भस्मसात झालं. माया गलांडे मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या, त्याचवेळी इकडे शॉर्टसर्किटमुळं घराला आग लागून ही दुर्घटना घडली.

आगीच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. मात्र तोवर गलांडे कुटुंबीयांची सगळी स्वप्न आगीत राख झाली होती. गलांडे कुटुंबीयांच्या घरावर आलेल्या या संकटामुळे सध्या त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. त्यामुळे त्यांनी दानशूर व्यक्तींकडे मदतीसाठी हात पसरले आहेत. परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: The house caught fire in Jalgaon Burn all items, including cash