Aaditya Thackeray : जळगावात राजकारण तापलं! युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 10:08 IST2022-08-20T09:58:36+5:302022-08-20T10:08:41+5:30
Aaditya Thackeray : धरणगावामध्ये अज्ञात व्यक्तींनी आदित्य ठाकरे य़ांच्या स्वागताचे बॅनर फाडल्याची घटना समोर आली आहे.

Aaditya Thackeray : जळगावात राजकारण तापलं! युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडले
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, ते जिल्ह्यात 3 ठिकाणी बंडखोरांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. यामध्ये मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील आणि चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघाचा समावेश आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच जळगावात राजकारण तापलं आहे.
धरणगावामध्ये अज्ञात व्यक्तींनी आदित्य ठाकरे य़ांच्या स्वागताचे बॅनर फाडल्याची घटना समोर आली आहे. बॅनर फाडल्याने मध्यरात्रीनंतर तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे शिवसैनिक प्रचंड संतप्त झाले होते. पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच धाव घेतली त्यामुळे अनर्थ टळला आहे.