विहिरीत आढळलं हरणाचं पिल्लू, अर्धमेल्या अवस्थेतच होतं; निसर्गप्रेमींनी घेतली धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 02:02 PM2022-08-18T14:02:22+5:302022-08-18T14:03:04+5:30

याठिकाणी सुरक्षित आदिवास निर्माण झाल्याने अनेक वन्यप्राणी व पक्षाची वाढ होत आहे. 

The baby deer found in the well in jalgaon was half-dead; Nature lovers took a run | विहिरीत आढळलं हरणाचं पिल्लू, अर्धमेल्या अवस्थेतच होतं; निसर्गप्रेमींनी घेतली धाव

विहिरीत आढळलं हरणाचं पिल्लू, अर्धमेल्या अवस्थेतच होतं; निसर्गप्रेमींनी घेतली धाव

googlenewsNext

जळगाव - जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडी परिसरात सामाजिक वनीकरण विभाग व लोकसहभागातून 25 हेक्टर क्षेत्रावर गतवर्षी व यंदाच्या वर्षी जवळपास 25 हजार झाडांचे वृक्षारोपण केले आहे. या क्षेत्रात चराईबंदी असल्याने गवत, नैसर्गिक झाडे, झुडपेही मोठ्या प्रमाणात वाढीस येत असल्याने जैवविविधताही वाढीस येत आहे. याठिकाणी सुरक्षित आदिवास निर्माण झाल्याने अनेक वन्यप्राणी व पक्षाची वाढ होत आहे. 

मागील आठवड्यातच निसर्गटेकडी संकल्पना साकारण्यासाठी प्रयत्नशील असलेले पर्यावरण प्रेमी सोमनाथ माळी यांनी वृतपत्रांच्यामाध्यमातून व सोशल मीडियाच्या माध्यमातून या क्षेत्रातील वन्यप्राणी व पक्षांसाठी संरक्षणाच्या उपाययोजना करण्याची मागणी केली होती. किशोर भरत राठोड व त्यांचा मुलगा नेहमीप्रमाणे शेतात आल्यावर पाणी काढण्यासाठी आपल्या विहिरीजवळ आले तेव्हा त्यांना विहिरीत हरणाचे एक छोटस पिल्लू अदमेल होऊन पोहतांना दिसले. त्यांनी लागलीच मुलाला आवाज देऊन दोर आणायला सांगुन पन्नास फुट पाणी असलेल्या विहिरीत उडी टाकून सदर पिलाला बाहेर काढले. लागलीच निसर्गटेकडी संकल्पना साकारत असलेले सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी सोमनाथ माळी यांना या बाबत कल्पना दिली. सोमनाथ माळी यांना शेतात गेल्यानंतर वनविभागाच्या आर.एफ.ओ.शितल नगराळे यांना माहिती दिली व  निसर्गटेकडीवर आणले. 

पाण्यात जास्त वेळ राहिल्यामुळे ते अतिशय अर्धमेल्या सारखे झाले होते. पायही धरत नव्हते.आर.एफ.ओ. मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली चार तास उबदार कपड्यात गुंडाळून व बकरीचे दूध पाजत घरगुती प्रथम उपचार केल्यानंतर ते तंदुरुस्त झाल्यानंतर निसर्गटेकडी परिसरात हरणांचे कळप वास्तवास असलेल्या ठिकाणी सोडून दिले. निसर्गटेकडी परिसरातील शेतकरी वन्यप्राण्यांमुळे आपल्या पिकांचे नुकसान होत असतांनाही वन्यप्राणींना कुठलेही नुकसान, ईजा पोहचवत नाही उलट काळजीच घेतात. या शेतकऱ्याचे व आर.एफ.ओ.मॅडम, सामाजिक वनिकरण विभागाचे सुर्यवंशी यांनी सहकार्य केल्याबद्दल सोमनाथ माळी यांनी आभार माणले.
 

Web Title: The baby deer found in the well in jalgaon was half-dead; Nature lovers took a run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.