Thane: ओव्हर टेकच्या नादात लक्झरी उलटली, पाळधी गावानजकची घटना, ३० ते ३५ प्रवाशी जखमी
By विलास.बारी | Updated: June 4, 2023 22:50 IST2023-06-04T22:48:25+5:302023-06-04T22:50:00+5:30
Thane: राष्ट्रीय महामार्गावर पाळधी गावानजीक असलेल्या हॉटेल सुगोकी जवळ रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास लक्झरी उलटल्याची घटना घडली.

Thane: ओव्हर टेकच्या नादात लक्झरी उलटली, पाळधी गावानजकची घटना, ३० ते ३५ प्रवाशी जखमी
- विलास बारी
जळगाव - राष्ट्रीय महामार्गावर पाळधी गावानजीक असलेल्या हॉटेल सुगोकी जवळ रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास लक्झरी उलटल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ३० ते ३५ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तत्काळ अपघातग्रस्त लक्झरीमधून जखमी प्रवाशांना बाहेर काढत मदतीचा हात देत रुग्णवाहिकेला बोलवून तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. जिल्हा रुग्णालयात देखील अरविंद देशमुख व ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी जखमींना उपचारासाठी दाखल केले. अकोल्याहून अहमदाबाद येथे (जी.जे.८.बी.व्ही.३०४२) क्रमांकाची ५५ प्रवासी घेवून जाणारी लक्झरी पाळधी गावानजीक असलेल्या सुगोकी हॉटेलजवळील ओव्हर टेक करताना एका खड्ड्यात उलटली. त्यात अनेक जण जखमी झाले असून, जखमी रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील सुध्दा याच रस्त्याने वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपल्या निवासस्थानी जात असतांना त्यांना अपघातग्रस्त लक्झरी दिसून आल्याने त्यांनी आपल्या गाड्याचा ताफा थांबवित लक्झरीमधून जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेला पाचारण करीत त्यांनी रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी माजी जि.प.सदस्य प्रताप पाटील, मुकुंद नन्नवरे, राहुल नेतलेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी मदतकार्य केले.