खांब हटविण्यासाठी महावितरणकडून निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 10:23 PM2019-11-13T22:23:47+5:302019-11-13T22:24:18+5:30

जळगाव : महामार्गांच्या चौपदरीकरणासाठी अडथळा ठरणारे विद्युत खांब हटविण्यासाठी महावितरणने निविदा प्रक्रिया काढली आहे. कालिंका माता मंदिर ते खोटे ...

Tenders from Mahavirajan to remove the pillars | खांब हटविण्यासाठी महावितरणकडून निविदा

खांब हटविण्यासाठी महावितरणकडून निविदा

Next

जळगाव : महामार्गांच्या चौपदरीकरणासाठी अडथळा ठरणारे विद्युत खांब हटविण्यासाठी महावितरणने निविदा प्रक्रिया काढली आहे. कालिंका माता मंदिर ते खोटे नगरपर्यंतच्या रस्त्यावरील विद्युत खांब हटवून व त्यानंतर नवीन विद्युत लाईन उभारणीसाठी महावितरणने चार कोटींच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे.
शहरा गेलेल्या सुमारे ८ किलोमीटर महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. चौपदरीकरणासाठी ६ आॅक्टोबरपासून निविदा प्रक्रिया सुरु झाली असून, आज निविदा भरण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान खांब हटविण्यासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय तडवी व इतर अधिकाऱ्यांनी यापूर्वीच जागेची पाहणी केली आहे. जिल्हा प्रशासनाकडे खर्चाचे अंदाजपत्रकही पाठविले. त्यानुसार, चार कोटी ११ लाखांचा निधी उपलब्ध करुन दिल्यानंतर महावितरणने पोल हटविण्यासाठी निविदा प्रक्रिया काढली आहे.

७ किलोमीटर पर्यंत नविन वीज वाहिनी टाकण्यात येणार
४चौपदरीकरणाच्या कामासाठी महावितरणतर्फे काढण्यात आलेल्या निविदेत म्हटले आहे की, कालिका माता मंदिर ते खोटेनगर या ७ किलोमीटर अंतरावरील वीज वाहिनी हटविण्यात येणार आहे. या ठिकाणी ३३ केव्ही व ११ केव्हीच्या मुख्य वाहिन्या असून, या वाहिन्या हटविल्यानंतर पुन्हा याच ठिकाणी ठराविक अंतरावर नवीन वीज वाहिनी उभारायची आहे. या कामासाठी इच्छुक मक्तेदारांनी सर्व कागपत्रांसह महावितरणच्या वेवसाईटवर आॅनलाईन निविदा भरायची आहे.

३३ केव्ही आणि ११ केव्हीच्या मुख्य वाहिन्यांवर घरगुती वीज ग्राहकांसह औद्योगिक ग्राहकांचादेखील समावेश आहे. खांब हटवितांना वीज पुरवठा खंडित होऊन, नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महावितरणने या ठिकाणचे खांब हटविण्याआधी नवीन वीज वाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आाहे. ही नवीन वाहिनी टाकण्यासाठी विद्युत तारा, खांब, जनित्र व इतर साधनसाम्रुगी खरेदी व इतर कामासांठी महावितरणला ४ कोटींचा निधी लागणार आहे. दरम्यान, नविन वीज वाहिनी टाकल्यावरच, महामार्गावरील अडथळा ठरणारे विद्युत खांब हटविण्यात येणार असल्याचे महावितरणच्या सुत्रांनी सांगितले.

Web Title: Tenders from Mahavirajan to remove the pillars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.