जळगावमध्ये बनावट दस्ताऐवजाद्वारे धान्य दुकानासाठी निविदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 16:10 IST2023-04-11T16:10:24+5:302023-04-11T16:10:37+5:30
देऊलवाडा येथील श्री.माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्थेने स्वस्त धान्य दुकानासाठी निविदा सादर केली होती.

जळगावमध्ये बनावट दस्ताऐवजाद्वारे धान्य दुकानासाठी निविदा
कुंदन पाटील
ज़ळगाव : तालुक्यातील देऊलवाडा येथील मनुदेवी संस्थेने स्वस्त धान्य दुकानासाठी बनावट दस्ताऐवज सादर केल्याचा आरोप तहसीलदारांकडे करण्यात आला आहे. या अर्जाच्या चौकशीनंतर ग्रा.पं.ने कुठलाही ठराव व पत्रव्यवहार केला नसल्याचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्याने या संस्थेचे बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याचे उघड झाले आहे.
देऊलवाडा येथील श्री.माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्थेने स्वस्त धान्य दुकानासाठी निविदा सादर केली होती. तत्कालिन सरपंच व ग्रामसेवकाने मनुदेवी संस्थेचे अध्यक्ष व सचिवांशी संगनमत करुन बनावट दस्ताऐवज जोडून निविदा सादर केल्याची तक्रार ग्रा.पं.सदस्य सुनील बाळू पाटील यांनी केली होती. त्यानुसार तहसीलदारांनी या अर्जाची गटविकास अधिकाऱ्यांकरवी चौकशी केली. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला आहे.त्यात या संस्थेला स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी ग्रामपंचायतीने कुठलाही ठराव व पत्रव्यवहार केला नसल्याचे उघड झाले आहे.