वीज कोसळून दहा शेळया ठार; मेंढपाळ थोडक्यात बचावला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2023 18:06 IST2023-04-28T18:06:16+5:302023-04-28T18:06:30+5:30

तोंडापूर ता. जामनेर येथे शुक्रवारी वादळासह मुसळधार पाऊस झाला.

Ten goats killed by lightning shepherd narrowly escaped | वीज कोसळून दहा शेळया ठार; मेंढपाळ थोडक्यात बचावला 

वीज कोसळून दहा शेळया ठार; मेंढपाळ थोडक्यात बचावला 

कैलास कोळी 

तोंडापूर (जळगाव) : तोंडापूर ता. जामनेर येथे शुक्रवारी वादळासह मुसळधार पाऊस झाला. वीज पडून १० शेळ्या ठार झाल्या. या घटनेत मेंढपाळाचा परिवार थोडक्यात बचावला आहे. 

तोंडापूर येथे दुपारी दीड वाजेच्या सुमारास वादळासह जोरदार पाऊस झाला. तब्बल एक तास झालेल्याा पावसात नदी- नाले तुडूंब भरून वाहू लागले. गावाजवळच निंबाच्या झाडावर वीज पडून नाशिक जिल्ह्यातील मेंढपाळाच्या मालकीच्या आठ बकऱ्या व दोन मेंढ्या ठार झाल्या. यात एक लाख वीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.  तलाठी शिवाजी काळे यांनी तात्काळ पंचनामा केला.
 

Web Title: Ten goats killed by lightning shepherd narrowly escaped

टॅग्स :Jalgaonजळगाव