बैलगाडीवरुन पडल्याने पारंबीत मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 15:00 IST2019-04-08T14:59:50+5:302019-04-08T15:00:17+5:30
जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले

बैलगाडीवरुन पडल्याने पारंबीत मजुराचा मृत्यू
जळगाव : शेतात काम करीत असताना बैलगाडीवरुन पडल्याने सापुरडा बळीराम गव्हाळ (४५, रा.पारंबी, ता.मुक्ताईनगर) या शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी पारंबी येथे घडली. सापुरडा हे भास्कर पंडित पाटील यांच्या शेतात काम करीत असताना दुपारी बैलगाडीवरुन पडले. डोक्याला व छातीला मार लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. सापुरडा गव्हाळ यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, एक अविवाहित मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.