अन् व्यथा मांडतांना शेतकऱ्याला झाले अश्रु अनावर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 21:32 IST2019-11-07T21:31:47+5:302019-11-07T21:32:43+5:30
अस्मानी संकट : माजी मंत्री गुलाबराव देवकरांनी केली बांधावर जाऊन पाहणी

अन् व्यथा मांडतांना शेतकऱ्याला झाले अश्रु अनावर...
जळगाव : अवकाळी पावसाने हाहाकार माजवल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ बुधवारी नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत असताना शेतकºयांनी त्यांच्या व्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडे माडल्या. हाताशी आलेला घास हिरावून गेल्यामुळे व्यथा मांडतांना शेतकरी शरद घुगे यांना अश्रु अनावर झाले होते़
यंदा राज्यासह जिल्ह्यात पावसाने कहरचं केला़ त्यात अवकाळी पावसामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतीतील ज्वारी, बाजरी, सोयाबीन आणि कापूसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ हाताशी आलेला घास हिरावून गेल्यामुळे शेतकºयांना अस्मानी संकट ओढावले आहे़ त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघातील शेतकºयांच्या व्यथा समजनू घेण्यासाठी व त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहचविण्यासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पदाधिकाºयांसह बुधवारपासून बांधावरील पाहणी दौºयाला सुरूवात केली आहे़ शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह अधिकाºयांचे पथकही असल्यामुळे त्यांनी देखील नुकसानग्रस्त शेतकºयांचे जागेवरच पंचनामे करून घेतले़ नंतर शेतकºयांच्या मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करणार असून मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देवकर यांनी पाहणी दरम्यान दिला़ या पाहणी दौºयात प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांनी देखील भेट दिली़ तसेच पाहणी दौºयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटील, शेतकी संघ संचालक गोकुळ चव्हाण, जि.प. सदस्य संतोष आंबटकर, बापू परदेशी, विनायक चव्हाण, ईश्वर पाटील, संजय बिºहाडे, अरूण कोळी, हेमंत पाटील, धवल पाटील, प्रविण पाटील, प्रा.डॉ. पाडुरंग पाटील, गोविंदा कोळी, रघुनाथ पालवे, छोटू सरकार, भैय्या पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती़
शेतकºयांनी मांडल्या व्यथा
बुधवारी सकाळी ८़३० वाजेपासून पाहणी दौºयाला सुरूवात करण्यात आली़ यावेळी गुलाबराव देवकर यांनी जळगाव तालुक्यातील चिंचोली, कुसुंबा, कंडारी, शिरसोली, विटनेर, वडली, पाथरी, म्हसावद, बोरनार यासह विविध गावातील नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतीवर जाऊन पाहणी केली़ यावेळी अनेक शेतकºयांना व्यथा मांडत असताना अश्रु अनावर झाले़ दरम्यान, संपूर्ण शेतातील सोयाबीनचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी शरद घुगे यांना अश्रु अनावर होऊन ते ढसाढसा रडले़