शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:20 IST2021-09-06T04:20:46+5:302021-09-06T04:20:46+5:30
बालनिकेतन विद्या मंदिर कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिरात मुख्याध्यापक रवींद्र माळी व नीलेश नाईक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. ...

शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा
बालनिकेतन विद्या मंदिर
कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिरात मुख्याध्यापक रवींद्र माळी व नीलेश नाईक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यानंतर विद्यार्थांनी जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, सानेगुरुजी यांच्या वेशभूषा सादर केल्या. तसेच वक्तृत्व व एकांकिका स्पर्धाही सादर केल्या. या ऑनलाईन झालेल्या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक वर्ग व इतर कर्मचारी सहभागी झाले होते.
जिजामाता विद्यालय
हरी विठ्ठल नगरातील जिजामाता माध्यामिक विद्यालयात मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षक संजय खैरनार, कृष्णा महाले, संगीता पाटील, दिनेश सोनवणे, विकास तायडे, आदी शिक्षक उपस्थित होते.
गुळवे विद्यालय
पुष्पावती गुळवे मुलींच्या विद्यालयात मुख्याध्यापिका हेमलता पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. पर्यवेक्षक धनराज माळी यांच्यासह इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते. तसेच शिक्षक दिनानिमित्त २ ते ७ सप्टेंबर दरम्यान ऑनलाईनद्वारे निबंध स्पर्धा, लेखन स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे.
अभिनव विद्यालय
अभिनव प्राथमिक विद्यालय व अध्यापिका विद्यालयात प्राचार्या सुवर्णा चौधरी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले, तर मुख्याध्यापक ललित नेमाडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थांच्या रंगभरण स्पर्धा, निबंधलेखन, वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आल्या.
महाराणा प्रताप विद्यालय
महाराणा प्रताप विद्यालयात मुख्याध्यापक डी. एस. पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर समिधा सोवनी व संजय चौधरी यांनी विद्यार्थांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी पर्यवेक्षक डी. बी. सोनवणे, गजेंद्र पाटील, आदी शिक्षक उपस्थित होते.
मानव सेवा विद्यालय
मानव सेवा विद्यालयात इयत्ता २ ते ७ वीच्या विद्यार्थांनी शिक्षकांविषयी मनोगत व्यक्त केले, तर इयत्ता ८ ते १० वीच्या विद्यार्थांनी ऑनलाईनद्वारे शाळा भरविली. यानंतर उपशिक्षिका रत्ना चोपडे यांनी विद्यार्थांना गुरूंचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, माया अंबटकर, शिशूच्या मुक्ता पाटील यांच्यासह इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.
चांदसरकर विद्यालय
कै. गिरीजाबाई नथूशेठ चांदसरकर बालमोहम मराठी शाळेत इयत्ता ५ ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका मनीषा कानडे, सुरेखा चौधरी व इतर शिक्षक उपस्थित होते.
जैन प्राथमिक विद्यालय
स्व. शेठ बी. एम. जैन प्राथमिक विद्यालयात शिक्षिका संगीता निकम यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.
देवकर प्रायमरी स्कूल
सौ. सु. ग. देवकर प्रायमरी स्कूलमध्ये मुख्याध्यापिका साधना महाजन यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपशिक्षक योगेश वंजारी यांच्या डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.