बोहर्डी येथील शिक्षकाची नैराश्यातून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 19:40 IST2019-10-06T19:39:05+5:302019-10-06T19:40:33+5:30

न्हावी येथील रहिवासी तथा बोहर्डी शाळेतील शिक्षक गणेश चुडामण कोलते यांनी विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली.

Teacher suicide in depression at Bohardy | बोहर्डी येथील शिक्षकाची नैराश्यातून आत्महत्या

बोहर्डी येथील शिक्षकाची नैराश्यातून आत्महत्या

ठळक मुद्देआमोद्याजवळ विषारी द्रव्य प्राशन करून संपविली जीवनयात्रादवाखान्यात नेण्यापूर्वीच झाला होता मृत्यू

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : यावल तालुक्यातील न्हावी येथील रहिवासी तथा बोहर्डी शाळेतील शिक्षक गणेश चुडामण कोलते (वय ५१) यांनी नैराश्यातून विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना ५ रोजी दुपारी घडली.
आमोदा रस्त्यावरील मोर नदीपात्रात जवळ त्यांनी आपली दुचाकी लावून काहीतरी विषारी द्रव्य प्राशन केले. ही घटना रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी पाहताच त्यांनी तत्काळ त्यांना फैजपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता.
याप्रकरणी त्यांचे भाऊ दिलीप चुडामण कोलते यांनी पोलिसात खबर दिली. यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तपास सपोनि प्रकाश वानखेडे पो.कॉ.अनिल महाजन करीत आहे आहे. कोलते यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Teacher suicide in depression at Bohardy