जळगावात भरधाव ट्रक दोन रिक्षांवर धडकला, शिक्षिका ठार, एका विद्यार्थ्यासह पाच जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 13:26 IST2018-02-24T13:24:47+5:302018-02-24T13:26:16+5:30
हा अपघात शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जळगावात महामार्गावर घडला

जळगावात भरधाव ट्रक दोन रिक्षांवर धडकला, शिक्षिका ठार, एका विद्यार्थ्यासह पाच जण जखमी
ठळक मुद्देट्रकच्या चालकास अचानक भोवळट्रकवरील नियंत्रण सुटले
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २४ - भरधाव वेगाने जाणारा ट्रक दोन रिक्षांवर धडकून झालेल्या अपघातात सीमा कोष्टी या शिक्षिका ठार झाल्या तर एका शालेय विद्यार्थ्यासह पाच जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जळगावात महामार्गावर घडला.
शहरातील अजिंठा चौफुलीकडून इच्छादेवी मंदिराकडे जाणाºया ट्रकच्या चालकास अचानक भोवळ आल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व तो समोरील दोन रिक्षांवर धडकला. यामधील जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यातील सीमा कोष्टी या शिक्षिकेला मृत घोषित करण्यात आले. जखमींमध्ये एका शालेय विद्यार्थ्याचा तसेच ट्रक चालकाचाही समावेश आहे.