तरसोद गणपती दर्शन ॲपचा आज शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:21 IST2021-09-06T04:21:28+5:302021-09-06T04:21:28+5:30
बांधकाम कामगारांसाठी शिबिर जळगाव : बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळावा, यासाठी ‘मुव्हमेंट फॉर पिस ॲण्ड ...

तरसोद गणपती दर्शन ॲपचा आज शुभारंभ
बांधकाम कामगारांसाठी शिबिर
जळगाव : बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळावा, यासाठी ‘मुव्हमेंट फॉर पिस ॲण्ड जस्टीस फॉर वेल्फेअर’च्यावतीने शिबिर घेण्यात आले. यामध्ये ८६ अर्ज भरुन घेण्यात आले. आयोजक मतीन पटेल, आरीफ देशमुख, अन्वर शेख, राजू पटेल, अशफाक देशपांडे, फहीम पटेल, अलफैज पटेल, नुरेजमिल पटेल उपस्थित होते.
शिक्षकांचा सत्कार
जळगाव : भारतीय जनता पार्टी जिल्हा ग्रामीणच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. भाजप कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्याहस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला व जिल्हा शिक्षक आघाडीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चौधरी, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, शिक्षक आघाडी उपाध्यक्ष पी. एस. सोनवणे आदी उपस्थित होते.