शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

ठार मारण्याच्या उद्देशाने तलाठ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली ढकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 20:58 IST

जळगाव : अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवले असता ट्रॅक्टर चालकाने तलाठ्याची कॉलर पकडून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने चाकाखाली ...

जळगाव : अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवले असता ट्रॅक्टर चालकाने तलाठ्याची कॉलर पकडून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने चाकाखाली ढकलून पलायन केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री दोन वाजता वावडदा ता. जळगाव येथे भरचौकात घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अवैध वाळू वाहतुक रोखण्यासाठी तहसीलदारांनी स्वतंत्र पथके नियुक्त केलेले आहेत. म्हसावद येथील तलाठी रामदास नेरकर, शिरसोली तलाठी भरत ननवरे, जळके येथील राहुल अहिरे, अनिरुद्ध खेतमाळीस व नितीन ब्याळे यांचे पथक नियुक्त शुक्रवारी रात्री म्हसावद भागात असताना रात्री दोन वाजता वावडदा चौफुलीवर विना क्रमांकाचे लाल रंगाचे ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करताना दिसले. त्यास तलाठी राहुल अहिरे यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रॅक्टर हळू केले नंतर तलाठी असल्याचे समजतात ट्रॅक्टर अंगावरून नेण्याचा प्रयत्न करुन पलायन केले.

पाठलाग करुन पकडले अन् परत निसटलापथकातील इतर सहकाऱ्यांनी पाठलाग करुन हे ट्रॅक्टर पुढे अडविले चालकास नाव विचारले असता सागर विनायक चव्हाण ( रा. वावडदा, ता.जळगाव) असे सांगितले. यावेळी चावी देण्यास सांगितले असता सागर याने तलाठी अहिरे यांना पकडून ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली ढकलले अहिरे यांनी क्षणातच स्वतःला सावरले, त्यानंतर सागर याने तिथून ट्रॅक्टर घेऊन पळ काढला. दरम्यान हा वाद होत असताना तलाठी भरती ननवरे यांनी मोबाईल मध्ये संपूर्ण घटनेचे चित्रण केलेले आहे शनिवारी संध्याकाळी या प्रकरणी सागर चव्हाण यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत. संशयित फरार असल्याची माहिती विशाल सोनवणे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव