कुत्रा चावल्यानंतर ही काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:12 IST2021-07-09T04:12:02+5:302021-07-09T04:12:02+5:30

- जखमेला झाकू नका किंवा पट्टी बांधू नका. ती उघडीच ठेवा आणि तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्या. - ...

Take care of this after the dog bites | कुत्रा चावल्यानंतर ही काळजी घ्या

कुत्रा चावल्यानंतर ही काळजी घ्या

- जखमेला झाकू नका किंवा पट्टी बांधू नका. ती उघडीच ठेवा आणि तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्या.

- इंजेक्शन जेवढ्या लवकर घेतले जाईल तेवढे चांगले.

- गंभीर जखम झालेल्यांना ॲन्टी रेबीज सिरम द्यावे लागते, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्या, उपचार घ्यायला विलंब करू नका, असा सल्ला वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील कळसकर यांनी दिला आहे.

नुकताच मुलाचा मृत्यू

कुत्रा चावलेल्या एका दहा वर्षीय मुलाचा नुकताच रेबीजने मृत्यू झाला होता. ममुराबाद परिसरात या मुलाला या कुत्र्याने चावा घेतला होता. शहरात व परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली असून यात महिलांपेक्षा पुरुषांना अधिक प्रमाणात कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय गेल्या पंधरा दिवसांपासून या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. एका दिवसाला १५ जणांना कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली होती. अनेक रस्त्यांवर कुत्र्यांच्या झुंडी असतात त्या थेट अंगावर धावून जातात, रात्री कामावरून घरी परतणाऱ्यांना या अनुभवातून जावे लागले, ही गंभीर परिस्थिती बघता महापालिकेने तातडीने याबाबत काही तरी पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरत आहे.

३३२ महिलांना चावा

गेल्या वर्षभरात मोकाट कुत्र्यांनी ३३२ महिलांना चावा घेतला आहे. शासकीय पातळीवर याची नोंद करण्यात आली आहे. त्यात १०५ लहान मुलींचा समावेश आहे. मात्र, पुरुषांपेक्षा हे प्रमाण कमी आहे. त्या तुलनेत वर्षभरात ११८६ पुरुषांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यात २२९ लहान मुलांचा समावेश आहे.

Web Title: Take care of this after the dog bites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.