शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

पावसाची छाया अन शेती पिकांवर नुकसानीची तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 16:38 IST

दि.१८ रोजी सायंकाळपासून अद्यापही पावसाच्या रिपरिपमुळे खरीप हंगामातील पीक हंगाम कापणी, काढणी वेळीच भडगाव तालुक्यात मोठे संकट शेतकºयांंसमोर आले आहे.

ठळक मुद्देभडगाव तालुक्यात शेतकऱ्यांची उडतेय धावपळतालुक्यात शेतकऱ्यांंसमोर मोठे संकट

अशोक परदेशीभडगाव, जि.जळगाव : दि.१८ रोजी सायंकाळपासून अद्यापही पावसाच्या रिपरिपमुळे खरीप हंगामातील पीक हंगाम कापणी, काढणी वेळीच भडगाव तालुक्यात मोठे संकट शेतकºयांंसमोर आले आहे. विधानसभा निवडणुकीचा बोलबाला चालू असून, मजूरटंचाईनेही शेती कामांना ब्रेक लागत आहे. शेती पिके कापणी, काढणीची कामे सुरू आहेत. पावसाची छाया पसरली आहे. शेती पिकांवर नुकसानीची टांगती तलवार आहे. त्यामुळे शेतकºयांची शेती कामांसाठी मोठी धावपळ उडाली आहे.तालुक्यात खरीप हंगामाची पीक पेरणी जवळपास ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर करण्यात आल्या होत्या. दमदार पावसाने शेती पिकेही जोमदार वाढत चांगल्या उत्पन्नाच्या वाटेवर होती. सततच्या जादा पारसाने णगदी बागायती कापूस पिकाच्या परिपक्व झालेल्या कैºया सडल्या व फुटलेल्या कापूस बोंडाचेही नुकसान झाले होते. एकंदरीत बागायती कापूस पिकाचे ३० ते ४० टक्के नुकसान झाले होते.सध्या शेती हंगाम काढणीचा धुमधडाका सुरू आहे. त्यात दि.१८ रोजी सायंकाळपासुन अचानक पाऊसाने रिपरीपचा मारा सुरु केला आहे.दि. १९ रोजीही सकाळपासून सायंकाळपर्यंत ब्रेक के बाद पावसाची रिपरिप सुरुच होती. दिवसभर पावसाचे वातावरण होते. सध्या शेती हंगाम कापणी, काढणीची कामे सुरु आहेत. ज्वारी, बाजरी, मका आदी पिकांची कापणी करुन जमिनीवर कणसे, चारा पङला आहे. कापूस वेचणीची कामे सुरू आहेत. त्यातच विधानसभा निवडणुका प्रचारात गावोगावी मजुरांना रोजगार मिळत असल्याने शेती कामांकडे मजुरांनी पाठ फिरविली आहे. मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. मजुरीचे दरही गगनाला भिडले आहेत. या अवकाळी पावसाने शेतकºयांंच्या अवकळा होताना दिसत आहेत. ज्वारी, बाजरी, मका, कपाशी आदी पिकांचे व चाºयाचे नुकसान होत आहे. शेतकरी व मजूर शेती पिकांची कामे धावपळीने आवरण्यात व्यस्त आहेत. असाच पाऊस चालला तर हाता तोंडात आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. पिकांवरचा खर्चही काढणे मुश्कील आहे. आता पावसाने विश्रांती घ्यावा, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे.

टॅग्स :RainपाऊसBhadgaon भडगाव