जळगावात धुळवड साजरी करीत असताना जाखनी नगरात तलवार हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:41 IST2018-03-03T19:41:18+5:302018-03-03T19:41:18+5:30
जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार

जळगावात धुळवड साजरी करीत असताना जाखनी नगरात तलवार हल्ला
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.३ : जाखनी नगर कंजरवाडा भागात शुक्रवारी सकाळी ११ वाजता धुळवड साजरी करीत असताना आकाश अरुण दहियेकर (वय ३०) या तरुणावर चार ते पाच जणांनी रॉड व तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यातील जखमी दहियेकर याला जिल्हा रुग्णालयात व तेथून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जाखनी नगरात सर्वत्र धुळवड साजरी होत असताना अचानकपणे आकाश दहियेकर याच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला चढविला. त्यांच्या हातात लोखंडी रॉड, तलवार होती असे जखमीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी गोविंदा गणेश बागडे, मठ्या अनिल बागडे, मायकल कन्हैया नेतलेकर व अन्य दोन अशा पाच जणांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हल्लेखोरांविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जखमीचे नातेवाईक शनिवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात आले होते.