तापीपात्रात तरुणाचा फुगलेला मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 22:36 IST2021-06-17T22:36:13+5:302021-06-17T22:36:36+5:30
धुरखेडा शिवारातील तापी नदीवरील निंभोरासीम - नांदुपिंप्री पुलाच्या खाली मृतदेह फुगलेल्या स्थितीत आढळून आला आहे.

तापीपात्रात तरुणाचा फुगलेला मृतदेह आढळला
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेर : तालुक्यातील धुरखेडा शिवारातील तापी नदीवरील निंभोरासीम - नांदुपिंप्री पुलाच्या खाली दोन तीन दिवसांपूर्वी फुगलेल्या स्थितीत एका ३० ते ३५ वर्षे वयोगटातील अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत युवकाच्या अंगात निळ्या रंगाचे ज्यावर पांढऱ्या व लाल रंगाची बारीक चौकटी असलेले लांब बाह्यांचे शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्टस् व दोन चाव्या असलेले किचन ज्यावर एका बाजूने इंग्रजीत दुसऱ्या लिपीत ‘वंडर’ तर दुसऱ्या बाजूला इंग्रजीतील पहिल्या लिपीत ‘विहान फुलॉन’ अशा लिहिलेल्या लॉकेटसह दोन चाव्या व उजव्या हाताच्या मनगटावर इंग्रजीत डिझाईनमध्ये कॅपिटल ‘एस एम’ अक्षरांचे गोंदकाम केलेले आहे.
मयत तरुणाचा सावळा रंग, मजबूत बांधा, काळे केस, चेहरा गोल, उंची सुमारे १६५ सें.मी. असे वर्णन आहे. मयताची ओळख पटल्यास रावेर पोलीस स्टेशनचे तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा मृतदेह राखून ठेवण्याच्या परिस्थितीत नसल्याने घटनास्थळीच रावेर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.सर्वेश अर्कडी यांनी शवविच्छेदन करून पोलिसांतर्फे अंत्यसंस्कार करण्यात आले.