वाकीच्या इसमाचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:57 IST2018-09-11T22:55:06+5:302018-09-11T22:57:15+5:30
वाकी बुद्रुक ता.जामनेर येथील रहिवासी दिलीप वामन पाटील (४४) या इसमाचा नाशिक येथे स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाल्याची घटना घडली.

वाकीच्या इसमाचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू
ठळक मुद्देनाशिक येथे होते खाजगी कंपनीत कामालाचार दिवसांपासून होते उपचार सुरुशोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
जामनेर : वाकी बुद्रुक ता.जामनेर येथील रहिवासी दिलीप वामन पाटील (४४) या इसमाचा नाशिक येथे स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाल्याची घटना घडली. दिलीप वामन पाटील हे नाशिक येथील एका खाजगी कंपनीत नोकरीला आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.