अमळनेर येथे उभारली स्वराज्य गुढी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 11:34 IST2021-06-06T11:32:24+5:302021-06-06T11:34:19+5:30

Jalgaon News : ध्वजावर सुवर्ण कलश, आंब्याची डहाळी, गाठी, पुष्पहार, अष्टगंध, हळद, अक्षता, कुंकू लावून  कलशावर अष्टगंधने शिवशक राजदंड स्वराज्य गुढी असे लिहिण्यात आले होते.

Swarajya Gudi erected at Amalner jalgaon | अमळनेर येथे उभारली स्वराज्य गुढी 

अमळनेर येथे उभारली स्वराज्य गुढी 

अमळनेर जि.जळगाव - अमळनेर पंचायत समितीत रविवारी सकाळी शिवस्वराज्य दिन साजरा झाला. आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. रविवारी सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम झाला. जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे या शिवरायांच्या पंच शुभचिन्हानी भगवा ध्वज अलंकृत करण्यात  आला होता.

ध्वजावर सुवर्ण कलश, आंब्याची डहाळी, गाठी, पुष्पहार, अष्टगंध, हळद, अक्षता, कुंकू लावून  कलशावर अष्टगंधने शिवशक राजदंड स्वराज्य गुढी असे लिहिण्यात आले होते. आमदार अनिल पाटील यांनी शिवरायांची मूर्ती व शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन केले. नंतर  राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत झाले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे, प्रवीण पाटील, निवृत्ती बागुल, अधीक्षक भुपेंद्र बाविस्कर, कक्ष अधिकारी  किशोर पाटील, विस्तार अनिल राणे, एल.डी. चिंचोरे, बालविकास प्रकल्प अधिकारी बी. बी. वारूळकर उपस्थित होते.
 

Web Title: Swarajya Gudi erected at Amalner jalgaon