स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:27 PM2020-01-13T22:27:25+5:302020-01-13T22:27:39+5:30

जळगाव : शहर आणि परिसरात विविध शैक्षणिक संस्था तसेच सामाजिक, राजकीय संघटनांतर्फे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती ...

 Swami Vivekananda, Rajmata Jijau Jubilee celebrated with enthusiasm | स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

googlenewsNext

जळगाव : शहर आणि परिसरात विविध शैक्षणिक संस्था तसेच सामाजिक, राजकीय संघटनांतर्फे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच युवादिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

न्यू इंग्लिश मिडियम स्कूल
न्यू इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व जिजाऊंची वेशभूषा करून त्यांच्या आयुष्यावर आधारित नाटीका सादर केली. तसेच माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणाव्दारे त्यांच्या कार्याची माहिती दिली. शिक्षक डी. बी. पाटील यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नशिराबाद येथे स्वामी विवेकानंद जयंती युवादिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आली. याप्रसंगी स्वयंसेवकांनी प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी प्रमोद धर्माधिकारी यांनी स्वामी विवेकानंद यांचा जीवन कार्याची माहिती तरुणांना दिली. विवेकानंदांच्या जीवन कार्याचा अभ्यास करा त्यांच्या ठिकाणी सर्व काही सकारात्मक आणि विधायक आहे. काही नकारात्मक नाही. असे सांगत प्रमोद धर्माधिकारी यांनी स्वामी विवेकानंदांचे विविध कथाभाग कथन केले. याप्रसंगी रिद्धेश कौण्डिण्य, अक्षय सोनार, पराग कुलकर्णी, तुषार मराठे, अमेय नाईक, संकेत वाणी, समीर वाणी, दर्शन जोशी, रोहित सोनार यांच्यासह असंख्य तरुण वर्ग उपस्थित होता.

महाराणा प्रताप विद्यालय
महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरा करण्यात आली. अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक डी. एस. पाटील हे होते. प्रमुख वक्ते प्रा.गजेंद्र पाटील यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रास्तविक व सूत्रसंचालन एस. जी. चौधरी यांनी केले. आभार समिधा सोवनी यांनी मानले.

Web Title:  Swami Vivekananda, Rajmata Jijau Jubilee celebrated with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.