बालिकेला पळविणारा संशयित वॉटेंड घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 08:32 PM2020-05-21T20:32:30+5:302020-05-21T20:33:56+5:30

बक्षीस जाहीर : बालिका पालकांच्या स्वाधीन

 Suspected kidnapping of girl declared wanted | बालिकेला पळविणारा संशयित वॉटेंड घोषित

बालिकेला पळविणारा संशयित वॉटेंड घोषित

Next

जळगाव : मदत करण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वाराने पळविलेल्या १३ वर्षाच्या मुलीला पळविणाºया गणेश सखाराम बांगर (३२, रा.मालेगाव, जि.वाशिम) याला जिल्हा पोलीस दलाने गुरुवारी वॉटेंड जाहीर केले असून त्याच्याबाबत माहिती देणाºयास योग्य ते बक्षीस दिले जाणार आहे. दरम्यान, गणेश याच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक विदर्भात रवाना झाले आहे.
मुलगी व संशयिताच्या शोधार्थ नशिराबाद पोलिसांचे पथक अमरावती जिल्ह्यात गेले होते. लोणी पोलीस स्टेशन येथून मुलीला घेऊन हे पथक मध्यरात्री नशिराबादला दाखल झाले. या मुलीची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे. लोणी येथे जाताना पोलिसांनी फियार्दी तथा मुलीच्या भावाला सोबत नेले होते. या बहीण-भावांची पहिली भेट तेथे झाली. त्यानंतर मध्यरात्री आई, वडिलांची भेट झाली. मुलीला पाहताच आई ढसाढसा रडली, तर घाबरलेल्या मुलीनेही आईला मिठी मारली.

दुचाकीही चोरीचीच़़
गणेश याच्याजवळ असलेली दुचाकी (क्र.एम.एच.३७ वाय १८४७) चोरीची असून त्यावर लाल अक्षरात इंग्रजीत प्रेस असे नाव लिहिलेले आहे. सध्याच्या लॉकडाउनमध्ये मजुरांचे स्थलांतर सुरू असल्याने त्याचा फायदा घेऊन रस्त्याने चालणाºया मजुरांशी गोड बोलून गावात सोडण्याचा तसेच मदत करण्याचा बहाणा करून महिला व मुलींना दुचाकीवर बसवून पळवून नेत आहे. या तीन दिवसात नशिराबाद व मूर्तीजापूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याशिवाय हॉटेल, ढाबा चालविण्यास घेतो, नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून तो लोकांची फसवणूक करतो.

अंगठ्यावर ‘माँ’...पंज्यावर ‘आई’
गणेश याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर ‘माँ’ असे हिंदीत तर पंजावर ‘आई’ असे लिहिले आहे. डाव्या हाताच्या मानेवर इंग्रजीत ‘साथिया’ असे लिहिले आहे. टिकटॉक व यूट्युब अ‍ॅपवर व्हिडिओ तयार करण्याचा त्याला छंद आहे. त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली तर उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ (मो :९४०४८०७२०७), स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (मो.९८२३०१९७११) व सहायक पोलीस निरीक्षक, नशिराबाद (मो.९६८९९०३५८८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी केले आहे. माहिती देणाºयाचे नाव गुप्त ठेवण्यासह योग्य ते बक्षीस दिले जाणार आहे.

Web Title:  Suspected kidnapping of girl declared wanted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.