जळगावात सुरक्षा रक्षकाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 12:37 IST2018-11-20T12:36:37+5:302018-11-20T12:37:09+5:30

वडीलांचा मृतदेह पाहून धक्का

Suspected death of security guard in Jalgaon | जळगावात सुरक्षा रक्षकाचा संशयास्पद मृत्यू

जळगावात सुरक्षा रक्षकाचा संशयास्पद मृत्यू

जळगाव : नवी पेठेत सुरक्षा रक्षक असलेले भास्कर श्रीधर चौधरी (६५, रा.नवी पेठ, जळगाव) या वृध्दाचा मृतदेह सोमवारी सकाळी ११ वाजता गुजरात स्वीट मार्टच्या परिसरात आढळून आला. त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गुजरात स्वीट मार्ट परिसरात अज्ञात इसमाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करीत असतानाच चौधरी यांचा मुलगा संदीप हा वडीलांचा शोध घेत घटनास्थळावर पोहचला. वडीलांचा मृतदेह पाहून त्याला धक्काच बसला. भास्कर चौधरी हे परिसरातच सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होते. रात्र पाळी करुन ते नेहमी सकाळी ६ वाजेला घरी येत असतात. सोमवारी ते आलेच नाही. तपास प्रवीण भोसले करीत आहे.

Web Title: Suspected death of security guard in Jalgaon