खासदार सुप्रिया सुळे यांची संवाद यात्रा जळगाव जिल्ह्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 11:08 IST2019-08-27T11:08:13+5:302019-08-27T11:08:35+5:30

मंगळवारी सायंकाळी सायंकाळी सात वाजता सुप्रिया सुळे राष्ट्रीय महाविद्यालयात डॉक्टर्स, वकील, व्यावसायिक यांच्याशी संवाद साधतील.

Supriya Sule's interaction with Jalgaon district | खासदार सुप्रिया सुळे यांची संवाद यात्रा जळगाव जिल्ह्यात 

खासदार सुप्रिया सुळे यांची संवाद यात्रा जळगाव जिल्ह्यात 

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ह्या संवाद यात्रेनिमित्त  मंगळवार २७ रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहेत. ही यात्रा दोन दिवस जिल्ह्यात असेल.  

मंगळवारी सायंकाळी सायंकाळी सात वाजता सुप्रिया सुळे राष्ट्रीय महाविद्यालयात डॉक्टर्स, वकील, व्यावसायिक यांच्याशी संवाद साधतील. २८ रोजी सकाळी ९ वाजता चाळीसगाव महाविद्यालयात संवाद कार्यक्रम होईल. त्यानंतर कनाशी (ता. भडगाव) तेथे देवदर्शन घेतील. दुपारी १२.२० वाजता पारोळा येथील किसान महाविद्यालयात  वकील, व्यापारी, डॉक्टर्स यांच्याशी संवाद साधणार आहेत. 

त्यानंतर संध्याकाळी ४.३० वाजता जळगावच्या राष्ट्रवादी भवनात पक्ष पदाधिका-यांशी संवाद आणि  सायंकाळी ६.१५  वाजता  कोल्हे हिल्स येथे रोटरीच्या पदग्रहण सोहळ्यास उपस्थिती देणार आहेत.

Web Title: Supriya Sule's interaction with Jalgaon district