शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

यंदाचा उन्हाळा वृद्धांसाठी ठरतोय कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 3:37 PM

यावर्षीच्या उन्हाळ्यातील तापमानाने अक्षरश: कहरच केला आहे. ४८ डिग्री सेल्सिअस पार केलेले तापमान वृद्धांसाठी कर्दनकाळच ठरले आहे. या उन्हाळ्यातील चार महिने अर्थात मार्च ते १५ जून या साडे तीन महिन्यातच पालिकेत झालेल्या मृत्यू नोंदणी वरून ८३ जणांचा मृत्यू झाला आहे, हे प्रमाण मागील वर्षी २०१८ मध्ये केवळ ५५ होते. त्यामुळे चार महिन्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा शंभरी पार करतो की काय याची भीती वाटू लागली आहे.

ठळक मुद्देफैजपूरसह परिसरातील चित्रगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दुपटीने वाढ

वासुदेव सरोदेफैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : यावर्षीच्या उन्हाळ्यातील तापमानाने अक्षरश: कहरच केला आहे. ४८ डिग्री सेल्सिअस पार केलेले तापमान वृद्धांसाठी कर्दनकाळच ठरले आहे. या उन्हाळ्यातील चार महिने अर्थात मार्च ते १५ जून या साडे तीन महिन्यातच पालिकेत झालेल्या मृत्यू नोंदणी वरून ८३ जणांचा मृत्यू झाला आहे, हे प्रमाण मागील वर्षी २०१८ मध्ये केवळ ५५ होते. त्यामुळे चार महिन्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा शंभरी पार करतो की काय याची भीती वाटू लागली आहे.यंदाच्या उन्हाळ्याने अक्षरश: लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच नाकीनऊ आणले आहेत. दररोज ४५ ते ४८ डिग्री सेल्सिअस पार केलेल्या या असह्य तापमानाचा फटका सर्वाधिक सत्तरी पार केलेल्या वृद्धांना बसला आहे. या जीवघेण्या उन्हामुळे अनेक वृद्धांचा मृत्यू झाला आहे. त्यात महिलांचे प्रमाण जास्त आहे.गेल्या वर्षभरात जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत मृत्यूचे प्रमाण १९७ ते त्यात १०६ पुरुष व ९१ स्त्रियांचा समावेश होता, तर या वर्षीच्या जानेवारी १९ ते १५ जूनपर्यंत हा आकडा ११९ पर्यंत पोहोचलेला आहे. ज्यात पुरुष ५९ तर स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण ६० असे आहेमागील वर्षी उन्हाळ्यात मार्च ते जून या चार महिन्यात मृत्यू झालेल्यांची संख्या ५५ होती, मात्र मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या मार्च ते १४ जून या साडे तीन महिन्यातच ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एप्रिल आणि जूनमध्ये मृत्युमुखी पडलेल्या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. अद्याप जून महिन्याचे पंधरा दिवस बाकी आहेत. त्यात उन्हाची तीव्रता कमी होण्याचे संकेत दिसत नाहीत. दररोज पालिकेत दोन चार जणांच्या मृत्यूची नोंद होत असल्याने चार महिन्यातील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या शंभरी पार करते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.उन्हाळ्यात वृद्धांमध्ये अतिसाराचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. तसेच रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे, हाता-पायाला मुंग्या येणे व त्याचा परिणाम किडनीवर होऊन किडनीचे कार्य मंदावते व त्यामुळेच मृत्यूला सामोरे जावे लागते. त्याकरिता उन्हाळ्यात शक्यतोवर वृद्धांनी व मधुमेहाच्या रुग्णांनी बाहेर फिरणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे व नियमित तपासण्या कराव्यात.-डॉ.अमितकुमार हिवराळे, फैजपूर

टॅग्स :SocialसामाजिकFaizpurफैजपूर