तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 21:21 IST2019-11-16T21:20:47+5:302019-11-16T21:21:01+5:30
जळगाव -शहरातील मेहरुण परिसरात सेंट्रींग कामगार साईदास हरी राठोड (वय-५०) यांनी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची ...

तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव-शहरातील मेहरुण परिसरात सेंट्रींग कामगार साईदास हरी राठोड (वय-५०) यांनी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी २़२० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, आत्महत्येचे कारण कळू शकले नाही़
मूळ कड्र ता. साक्री जि.धुळे येथील रहिवासी साईदास हरी राठोड हे काही वषार्पूर्वी रोजगारानिमित्ताने मेहरुण मध्ये स्थायिक झाले आहे. पत्नी लताबाई, मुलगा विकास व मुलगी भारती असा त्यांचा परिवार आहे. भारती ही तिच्या मावशीकडे कुसूंब्याला राहते. मुलगा विकास हा नुतन मराठा महाविद्यालयात ११ वीला शिक्षण घेत आहे़ शुक्रवारी पत्नी लताबाई या कामावर तर मुलगा विकास महाविद्यालयात गेला होता. साईदास घरी एकटे होते. दुपारी २़२० वाजेच्या सुमारास मुलगा विकास हा जेवणासाठी घरी आला. दरवाजा उघडला असता, त्याला वडील साईदास हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी शेजारील बंकट मांगीलाल चव्हाण यांना प्रकार कळविला. रहिवाशांच्या मदतीने पोलिसांना माहिती देण्यात आली व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. याठिकाणी मुलगा व पत्नी यांनी आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.