भुसावळ तालुक्यात पिता-पुत्राची रेल्वेखाली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 13:18 IST2018-07-02T13:18:12+5:302018-07-02T13:18:43+5:30
२ जुलै रोजी उघडकीस आली घटना

भुसावळ तालुक्यात पिता-पुत्राची रेल्वेखाली आत्महत्या
वरणगाव, जि. जळगाव : भुसावळ तालुक्यातील आचेगाव शिवारात रेल्वे खाली पिता-पुत्राने आत्महत्या केल्याची घटना २ जुलै रोजी उघडकीस आली.
रेल्वेच्या अप लाईन खांबा क्र ४६२ / १३ जवळ रेल्वे खाली आल्याने संदिप पंढरी बावस्कर (वय ३६) व मुलगा संकेत संदिप बावस्कर दोघे रा. पिंपळगाव बु. असे मृतांचे नावे आहेत. त्यांनी आत्महत्या केली असावी, असे सांगितले जात आहे.
याबाबद अशोक केदारे यांच्या खबीर वरून वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मुत्यूची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास हवालदार अशोक जवरे करित आहे.