गळफास घेऊन प्रौढाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 21:27 IST2019-11-25T21:13:50+5:302019-11-25T21:27:57+5:30
अडावद, ता.चोपडा : काकांच्या राहत्या घरात ४० वर्षीय पुतण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २५ रोजी दुपारी ३ ...

गळफास घेऊन प्रौढाची आत्महत्या
अडावद, ता.चोपडा : काकांच्या राहत्या घरात ४० वर्षीय पुतण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास धानोरा येथे घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील रहिवासी लक्ष्मीकांत ऊर्फ लखू दिनकर कुलकर्णी (वय ४०) यांनी धानोरा येथील काका चिंतामण काशीनाथ कुलकर्णी यांच्या घरात छताला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि योगेश तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली जगदिश कोळंबे हे करीत आहेत.