चोपडा तालुक्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:43 IST2019-03-28T23:43:26+5:302019-03-28T23:43:40+5:30
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही

चोपडा तालुक्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
चोपडा : तालुक्यातील मामळदे येथील युवक राहुल मोतीलाल पाटील (२३) याने काकाच्या शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, २८ रोजी दुपारी पावणे तीन वाजेपूर्वी राहुल मोतीलाल पाटील (२३) या युवकाने मामलदे शेतशिवारात मोतीराम गेंदा पाटील यांच्या शेतात आंब्याच्या झाडाला दोराने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला प्रवीण भास्कर पाटील (रा.मामळदे) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर जवागे हे करीत आहेत.