यावल तालुक्यात दोन जणांच्या गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:28 IST2018-10-27T17:27:52+5:302018-10-27T17:28:30+5:30
यावल तालुक्यातील दहिगाव व सावखेडासीम शिवारात शनिवारी दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

यावल तालुक्यात दोन जणांच्या गळफास घेऊन आत्महत्या
यावल, जि.जळगाव : तालुक्यातील दहिगाव व सावखेडासीम शिवारात शनिवारी दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
दहिगाव येथील महाजन गल्लीत अक्षय धनराज महाजन (वय १९) याने दुपारी दीड वाजेच्या सुमारास किचन रूमच्या छताला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची खबर गौरव किशोर महाजन याने दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अक्षयच्या पश्चात आई-वडील, आजी, मोठे काका, भाऊ असा परिवार आहे. तो भाजपाचे किशोर महाजन यांचा पुतण्या होय.
याशिवाय सावखेडासीम शिवारात नागा देवी गावठाणात गुरलाल महारू बारेला (वय ३८) याने सकाळी तीन ते सात वाजेच्या दरम्यान बोरीच्या झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची खबर पोलीस पाटील नरसिंग बारेला यांनी दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल शेखर तडवी सिकंदर तडवी व सहकारी करीत आहे.