गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 15:31 IST2019-06-21T15:30:07+5:302019-06-21T15:31:11+5:30
लक्ष्मण प्रताप टाक (३८) यांनी राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

गळफास घेऊन आत्महत्या
भुसावळ: शहरातील गोविंद कॉलनी येथील रहिवासी व भुसावळ नगरपालिकेत पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी लक्ष्मण प्रताप टाक (३८) यांनी राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना २० जून रोजी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
या घटनेने पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. देवीदास टाक यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, लक्ष्मण टाक यांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलीस कारणांचा शोध घेत आहेत. लक्ष्मण टाक यांच्या पश्चात पत्नी, आई असा परिवार आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सुपडा पाटील करीत आहेत. दरम्यान, घरात कोणीच नसताना ही घटना घडली आहे.