पाच विषयात नापास झाल्याने जळगाव येथील तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 13:08 IST2018-06-06T13:08:31+5:302018-06-06T13:08:31+5:30
पाच विषयात नापास झाल्याने शासकीय तंत्रनिकेतनचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी साहिल राजू उर्फ उल्हास तडवी (वय १७, रा,लक्ष्मी नगर, संचारनगर, जळगाव) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडे सहा वाजता उघडकीस आली. साहिल हा फक्त दोनच विषयात पास झाला आहे.

पाच विषयात नापास झाल्याने जळगाव येथील तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,६ : पाच विषयात नापास झाल्याने शासकीय तंत्रनिकेतनचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी साहिल राजू उर्फ उल्हास तडवी (वय १७, रा,लक्ष्मी नगर, संचारनगर, जळगाव) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडे सहा वाजता उघडकीस आली. साहिल हा फक्त दोनच विषयात पास झाला आहे. दरम्यान, याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली अशी की, साहिल हा शासकीय तंत्रनिकेतनला प्रथम वर्षाच्या द्वीतीय सत्राला शिक्षण घेत होता. या परिक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी रात्री बारा वाजता जाहीर झाला. कुटुंबासोबत जेवण झाल्यानंतर साहिल हा वरच्या मजल्यावर झोपायला गेला. रात्री बारा वाजता त्याने आॅनलाईन निकाल पाहिला असता फक्त दोनच विषयात पास व पाच विषयात नापास झाल्याने त्याला जबर धक्का बसला. तणावात येवून त्याने रात्रीच गळफास घेतला. सकाळी साडे सहा वाजता लहान भाऊ समीर हा त्याला उठविण्यासाठी गेला असता आतून दरवाजा बंद होता, प्रतिसाद मिळत नसल्याने समीरने खिडकीतून पाहिले असता त्याने गळफास घेतला होता घाबरलेल्या समीरने तातडीने खाली आई, वडीलांना हा प्रकार सांगितला. गळफास घेतलेल्या अवस्थेत मुलाला पाहताच आई, वडीलांना हंबरडा फोडला.