जगवाणी नगरात वृध्दाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 22:43 IST2021-01-29T22:43:27+5:302021-01-29T22:43:27+5:30
जळगाव : जगवाणी नगरातील रवींद्र बंडू बाविस्कर (६२) यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. ...

जगवाणी नगरात वृध्दाची आत्महत्या
जळगाव : जगवाणी नगरातील रवींद्र बंडू बाविस्कर (६२) यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रवींद्र बाविस्कर यांनी गुरूवारी दुपारी गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात येताच, त्यांनी लागलीच बाविस्कर यांना जिल्हा रूग्णालयात हलविले. परंतु, वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले़ याप्रकरणी पोलिसात सीएमओ डॉ. प्रवीण पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.