उटखेडा येथील तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 21:50 IST2019-11-18T21:49:59+5:302019-11-18T21:50:04+5:30
आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

उटखेडा येथील तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
उटखेडा ता. रावेर : उटखेडा येथील ग्राम पंचायतीतील सफाई कामगार निलेश बत्ताराम रिल (वय ४२) या इसमाने ग्राम पंचायतीच्या बंद असलेल्या जुन्या कार्यालयाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने येथे खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
या संदर्भात प्राप्त वृत्त असे की, निलेश बत्ताराम रील(वय ४२) हा इसम उटखेडा येथील ग्रामपंचायतीच्या जुन्या खोलीत रहात होता. तो ग्राम पंचायतीत सफाई कामगार होता. दरम्यान सकाळी ७ वाजता त्यांचा मुलगा त्याला उठविण्यासाठी गेला असता, त्याला घरातून प्रतिसाद मिळाला नाही. मुलाने घाबरून शेजारील व्यक्तींशी संपर्क साधला. खिडकी व दरवाज्याच्या फटीतून बघितले असता . त्यांना निलेश घरातील पंख्याला दोरीच्या साह्याने लटकलेला दिसून आला. नागरिकांची याची माहिती तात्काळ गावातील पोलीस पाटील यांना कळविली. पोलीस पाटील यांनी घटनास्थळी येऊन माहिती रावेर पोलिसांना कळविली. रावेर पोलिस स्टेशनचे जितेंद्र पाटील व त्यांचे सहकारी काही वेळातच घटनाथळी आले व त्यांनी पंचनामा केला. रावेर पोलिसात याप्रकरणी अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जितेंद्र पाटील हे करीत आहेत.