साखर व्यापाऱ्याचे पैसे लुटणाऱ्याला भोपाळमधून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST2021-08-13T04:20:23+5:302021-08-13T04:20:23+5:30

एरंडोल येथील नाना नथ्थू पाटील हे एरंडोल येथील साखर व्यापाऱ्याचे सोयगाव, शेंदुर्णी, पहूर या भागांतून ७ लाख ९० हजार ...

Sugar trader's money launderer arrested in Bhopal | साखर व्यापाऱ्याचे पैसे लुटणाऱ्याला भोपाळमधून अटक

साखर व्यापाऱ्याचे पैसे लुटणाऱ्याला भोपाळमधून अटक

एरंडोल येथील नाना नथ्थू पाटील हे एरंडोल येथील साखर व्यापाऱ्याचे सोयगाव, शेंदुर्णी, पहूर या भागांतून ७ लाख ९० हजार रुपये घेऊन वावडदामार्गे घरी परत जात असताना सात मार्च रोजी मध्यरात्री दोघांनी कार अडवून पाटील यांना मारहाण करून पैसे व कार घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मार्च महिन्यात अटक केलेल्या डासमाऱ्या याच्याकडून ४० हजार रुपये रोख व कार जप्त करण्यात आली होती. जास्त रक्कम तुकाराम याच्याकडे होती. त्यामुळे तो पंजाब व गुजरात राज्यांत मौजमजा करीत होता. तो भोपाळ येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी गणेश शिरसाळे, मुकेश पाटील व हेमंत पाटील यांना रवाना केले होते. या पथकाने सलग दोन दिवस सापळा रचून त्याला बुधवारी ताब्यात घेतले. तपासाधिकारी अमोल मोरे व रतीलाल पवार यांनी त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्या. ए.एस. शेख यांनी त्याला १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड. प्रिया मेढे यांनी बाजू मांडली.

Web Title: Sugar trader's money launderer arrested in Bhopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.