पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे सद्भावना दिनी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 23:14 IST2019-08-20T23:13:48+5:302019-08-20T23:14:01+5:30

लोहारा येथील डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सद्भावना शपथ घेतली.

The students took an oath at Lohara in Panchora taluka | पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे सद्भावना दिनी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे सद्भावना दिनी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

लोहारा, ता.पाचोरा, जि.जळगाव : येथील डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सद्भावना शपथ घेतली.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस .एस. जैन, शाळेच्या पर्यवेक्षिका यु.डी. शेळके तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षक विजय शिरापुरे यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या कार्याला उजाळा दिला. शिक्षक पी.एम. सुर्वे यांनी राजीव गांधी यांनी तंत्रज्ञानाची माहिती भारतीय लोकांसमोर कशी आणली याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
मुख्याध्यापक सुहास एस. जैन यांनी राजीव गांधी यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांना सद्भावना हे जीवनमूल्य आपल्या जीवनात कसे वापरावे याविषयी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना सद्भावना शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. शिक्षक एस.के.पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकांनी सहकार्य केले.

Web Title: The students took an oath at Lohara in Panchora taluka