जळगाव : शहरातील शाळांमध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षकांची भूमिका साकारत ज्ञानदानाचे कार्य केले. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध खेळांचे व स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यातील विजेत्या शिक्षकांना मुख्याध्यापकांची भूमिका साकारलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
प.वि. पाटील व ए. टी. झांबरे विद्यालय (फोटो)
गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर तसेच ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यामंदिरात पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शिरसाट यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांची भूमिका साकारून विद्यार्थ्यांना शिकवले. मुख्याध्यापक रेखा पाटील व डी.व्ही. चौधरी तसेच पालक शिक्षक संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
००००००००
सरस्वती विद्यामंदिर (फोटो)
सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका कल्पना वसाने यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका दीपाली देवरे यांनी मार्गदर्शन केले. यानिमित्ताने पार्थ जगताप, यामिनी पाटील, अंजली बागुल या विद्यार्थ्यांनी तसेच भगवान जगताप, रामलाल बारेला या पालकांनी त्यांचे शिक्षकांबद्दलचे मनोगत व्यक्त केले. या उपक्रमाचे आयोजन सुवर्णलता अडकमोल यांनी केले होते.
००००००००
उज्ज्वल स्प्राउटर इंटरनॅशनल स्कूल (फोटो)
उज्ज्वल स्प्राउटर इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन साजरा केला. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास घेतले. समृद्धी मोरे हिने मुख्याध्यापक, माही जैन हिने नर्सरी ते सहावीची समन्वयक, खुशी पाटील हिने सातवी ते दहावीची समन्वयक तर ओम सोनावणे याने प्रशासकीय समन्वयक म्हणून तर इतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या रूपाने आपल्या भूमिका पार पाडल्या. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध खेळांचे तसेच इंडो वेस्टर्न ड्रेस स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात विद्यार्थ्यांकडून बेस्ट ड्रेसचा पुरस्कार शिक्षक सूर्यकांत वाघमारे तसेच शिक्षिका काजल तेजवानी यांची निवड करून देण्यात आला. यावेळी शाळेच्या अध्यक्षा अनघा गगडाणी व मुख्याध्यपिका मानसी गगडाणी यांची उपस्थिती होती.
००००००००
विवेकानंद प्रतिष्ठान निवासी विभाग
विवेकानंद प्रतिष्ठान निवासी विभागातर्फे शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन तासिकांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजक संजय कानडे व विनोद पाटील होते. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सुंदर गणित, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, विज्ञान, इतिहास या विषयाचे तास घेतले. विपुल खाचणे, मयूर पाटील, वरुण बाविस्कर, भावेश बोडखे आदित्य पाटील, दिपक बोंडे, जयेश अग्रवाल, यश पाटील हर्षल मालपुरे, अथर्व कुरकुरे, कृष्णल पाटील, नंदन पाटील, यश पाटील, साई पाटील, वेदांत पाटील या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारली होती.