Students! New schedule announced; Now final year exams from 12th October | विद्यार्थ्यांनो ! नवीन वेळापत्रक जाहीर ; आता १२ आॅक्टोंबरपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा

विद्यार्थ्यांनो ! नवीन वेळापत्रक जाहीर ; आता १२ आॅक्टोंबरपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा

जळगाव : विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या लेखनी बंद आंदोलनामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पुढे ढकलली गेलेली अंतिम वर्ष /अंतिम सत्राच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा आता १२ आॅक्टोंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नवीन वेळापत्रक सुध्दा जाहीर केले गेले आहे.

विविध मागण्यांसाठी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लेखनी बंद आंदोलन पुकारले होते़ परिणामी, विद्यापीठातील संपूर्ण कामकाज ठप्प पडल्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, काही मागण्यांची लवकरच पुर्तता करण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर तूर्त कर्मचा-यांनी आंदोलन मागे घेतले आहे़ त्यामुळे विद्यापीठाकडून पुढे ढकलेल्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार १२ आॅक्टोंबरपासून आता अंतिम वर्षाच्या परीक्षेला सुरूवात होणार आहे. तसे वेळापत्रकही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असून ते विद्यार्थ्यांची पहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Students! New schedule announced; Now final year exams from 12th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.