पाचोरा-जामनेर पी.जे.रेल्वेतून पडून कुºहाड येथील विद्यार्थी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 17:25 IST2018-01-16T17:16:31+5:302018-01-16T17:25:04+5:30

पाचोºयाकडून जामनेरकडे जाणाºया पाचोरा-जामनेर पी.जे.रेल्वेतून पडून मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कुºहाड येथील वाल्मिक समाधान चौधरी (वय-१७) या विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे.

Students from Kurhard-Jamnar PJ Railway were seriously injured in the accident | पाचोरा-जामनेर पी.जे.रेल्वेतून पडून कुºहाड येथील विद्यार्थी गंभीर जखमी

पाचोरा-जामनेर पी.जे.रेल्वेतून पडून कुºहाड येथील विद्यार्थी गंभीर जखमी

ठळक मुद्देधावत्या रेल्वेतून पडल्याने विद्यार्थी जखमीडोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पाचोरा येथे उपचारासाठी हलविलेविद्यार्थ्याने चालत्या गाडीतून उडी मारल्याची चर्चा

आॅनलाईन लोकमत
वरखेडी ता.पाचोरा , दि.१६ : पाचोºयाकडून जामनेरकडे जाणाºया पाचोरा-जामनेर पी.जे.रेल्वेतून पडून मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कुºहाड येथील वाल्मिक समाधान चौधरी (वय-१७) या विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याला पाचोरा येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले.
जखमी वाल्मिक याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे सुरुवातीला तो संवेदनाहीन झाला. त्याच्या तोंडून फेस निघत असल्याने भोकरी येथील माऊली क्लिनिकच्या डॉ.वैशाली पाटील यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले. डॉ.पाटील यांनी त्याच्यावर प्रथमोपचार केल्यावर तो थोडा शुद्धीत आला. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला पाचोरा येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, वाल्मिक हा पाचोरा येथून आपल्या मित्रांसह पी.जे.रेल्वेने वरखेडी येत होता. वरखेडी आल्यावर त्याचे मित्र रेल्वेतून उतरले. परंतु वाल्मिकला झोप लागली होती आणि जामनेरच्या दिशेने रेल्वे निघाली असताना सांगवी रस्त्याच्या क्रॉसिंग जवळ त्याने चालत्या गाडीतून उडी मारल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title: Students from Kurhard-Jamnar PJ Railway were seriously injured in the accident