साकळी येथे प्लॅस्टिक मुक्तीसाठी विद्यार्थ्यांचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 16:18 IST2019-10-01T16:13:52+5:302019-10-01T16:18:44+5:30

साकळी येथील शारदा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात प्लॅस्टिक मुक्ती व मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

Students' contribution to plastic liberation at Chainsaw | साकळी येथे प्लॅस्टिक मुक्तीसाठी विद्यार्थ्यांचे योगदान

साकळी येथे प्लॅस्टिक मुक्तीसाठी विद्यार्थ्यांचे योगदान

ठळक मुद्देशारदा विद्यामंदिरात स्वच्छता प्लॅस्टिक मुक्ती मतदान जनजागृती मोहीमविद्यार्थ्यांनी परिसराची केली स्वच्छता

साकळी, ता.रावेर, जि.जळगाव : येथील शारदा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात स्वच्छता हीच सेवा अंतर्गत परिसर स्वच्छता प्लॅस्टिक मुक्ती व मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य जी.पी.बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी शालेय परिसर, गावातील मुख्य चौक, मधुकर महाजन चौक, लोधी वाडा, पाटील वाडा, मुजुमदार चौक, चौधरी वाडा, वाणी गल्ली, भवानी माता मंदिर परिसर स्वच्छ केला व मतदान जनजागृती केली.
उपक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Students' contribution to plastic liberation at Chainsaw