एस.टी.च्या पासेस् मिळत नसल्याने मुक्ताईनगरला विद्यार्थ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 13:07 IST2019-08-22T13:06:29+5:302019-08-22T13:07:25+5:30
विद्यार्थी संतप्त

एस.टी.च्या पासेस् मिळत नसल्याने मुक्ताईनगरला विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुक्ताईनगर, जि. जळगाव : तीन-तीन दिवस रांगेत उभे राहूनही शालेय विद्यार्थ्यांना बसच्या पासेस् मिळत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी मुक्ताईनगर बसस्थानकावर आंदोलन केले.
पाससाठी आॅनलाईन नोंदणी करून विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड दिले जात आहे. मात्र यासाठी बराच वेळ लागत आहे. यासाठी विद्यार्थी पहाटेपासूनच बसस्थानवर येऊन बसत आहे. तरीदेखील पास मिळत नसल्याने विद्यार्थी हैराण झाले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या अखेर गुरुवारी सकाळी आंदोलन केले.