रावेर तालुक्यातील विवरे येथे १९९७ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 18:30 IST2018-11-12T18:30:12+5:302018-11-12T18:30:57+5:30

विवरे येथील ग.गो.बेंडाळे हायस्कूलमध्ये १९९७ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला.

Students of 1997 batches of Vivere in Raver Taluka will join the students | रावेर तालुक्यातील विवरे येथे १९९७ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

रावेर तालुक्यातील विवरे येथे १९९७ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

ठळक मुद्देतब्बल २१ वर्षांनंतर जमले विद्यार्थीगप्पा-गोष्टीत दिला शाळेतील गत स्मृतींना उजाळागुरुजनांचा केला आदर-सत्कार

विवरे, ता.रावेर, जि.जळगाव : येथील ग.गो.बेंडाळे हायस्कूलमध्ये १९९७ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला. तब्बल २१ वर्षांनंतर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थी जमले होते. यात विद्यार्थ्यांनी गत स्मृतींना उजाळा दिला.
या कार्यक्रमात कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या सर्व मित्र मैत्रिणी एकत्र जमल्याचे आनंदमय वातावरण पाहून आयोजकांचेदेखील उपस्थितांनी कौतुक केले.
मुख्याध्यापक ए.जी.महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात अभिषेक गुप्ता, ऋषिकेश गुप्ता, सुभाष पाटील, विपीन राणे, महेश झोपे, अतुल बोरोले, योगेश सरोदे, फारूख तडवी यांनीही मनोगत व्यक्त केले. तब्बल २१ वर्षांनंंतर हा कार्यक्रम झाल्याने खूप आनंदीत झाल्याचे या मंडळींनी बोलताना सांगितले. सूत्रसंचालन गोपाळ पाटील यांनी केले.


 

Web Title: Students of 1997 batches of Vivere in Raver Taluka will join the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.