शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

By admin | Updated: March 4, 2015 15:16 IST

शहरातील माळी गल्ली भागात राहणार दामू देवीदास चौधरी यांचा मुलगा आदित्य देवीदास चौधरी याच्या अपहरणाचा प्रयत्न आज येथे झाला. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली होती.

जामनेर : शहरातील माळी गल्ली भागात राहणार दामू देवीदास चौधरी यांचा मुलगा आदित्य देवीदास चौधरी याच्या अपहरणाचा प्रयत्न आज येथे झाला. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली होती. आदित्य हा शाळेत गेला असता अपहरणकर्त्यांनी त्याला पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थ्याने स्वत:च अपहरणकर्त्यांच्या हातास हिसका मारून स्वत:ची सुटका करून घेतल्याने हा प्रयत्न फसला. शहरातील नूतन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये शिकणारा आदित्य चौधरी हा शाळेतून घराकडे येत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या पांढर्‍या रंगाच्या ओमनी गाडीतून उतरून एक महिला व पुरुषाने त्याच्याजवळ येऊन त्याला चॉकलेट खायला दिले. मात्र त्याने ते खाण्यास नकार दिला. यानंतर त्याला अपहरणकर्त्यांनी हात ओढून गाडीत बसविले. यावेळी त्याला अपहरणकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. मात्र विद्यार्थ्याने त्याच्या हातातून हात सुटताच गाडीतून बाहेर उडी घेऊन पळ काढला. त्यानंतर शाळेतील काही शिक्षक गाडीजवळ आल्याने अपहरणकर्त्यांनी तिथून पळ काढला ही घटना सदर विद्यार्थ्याने घरी येऊन आपल्या वडिलास सांगितली. त्यानंतर दत्तू चौधरी यांनी याबाबत जामनेर पोलिसात कळविले. एक ते दीड तासानंतर पोलीस उपनिरीक्षक मोहन बोरसे यांनी घरी जाऊन घडलेला प्रकार विचारला. विद्यार्थ्याने आपबिती सांगितली. नेहमी होणार्‍या अपहरणाच्या प्रयत्नाच्या प्रकारामुळे जामनेर शहरासह तालुक्यातील विद्यार्थी, पालकवर्गात भीतीचे वातावरण आहे.