जळगावात दोन पोलिसात जोरदार हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 22:52 IST2018-07-31T22:50:04+5:302018-07-31T22:52:06+5:30

किरकोळ वादातून पोलीस लाईनमध्ये मंगळवारी दुपारी एक वाजता दोन पोलिसांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली.

Strong clash between two policemen in Jalgaon | जळगावात दोन पोलिसात जोरदार हाणामारी

जळगावात दोन पोलिसात जोरदार हाणामारी

ठळक मुद्देकिरकोळ वादातून झाली हाणामारीपोलीस मुख्यालय व अधीक्षक कार्यालयात जोरदार चर्चाहाणामारीत एका पोलिसाचे फाटले कपडे

जळगाव : किरकोळ वादातून पोलीस लाईनमध्ये मंगळवारी दुपारी एक वाजता दोन पोलिसांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. यात एका पोलिसाचे कपडे फाटले होते. या घटनेची पोलीस स्टेशनला नोंद नसली तरी पोलीस मुख्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयात या फ्रि स्टाईलची जोरदार चर्चा होती.
जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला असलेला एक कर्मचारी व दुसरा शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेला कर्मचारी दोन्ही पोलीस लाईनमध्ये शेजारी राहतात. गल्लीत दुचाकी पार्कींगचा असो कि अन्य वस्तू ठेवण्याबाबत एका कर्मचाऱ्याकडून सतत विरोध होत असतो. जागा कोणाच्याही मालकीची नसताना नेहमीच विरोध का या कारणावरुन या कर्मचाºयाचे इतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाशी सतत वाद झालेले आहेत. मंगळवारी या कर्मचाºयाने दुसºया कर्मचाºयाच्या पत्नीला अपशब्द वापरुन शिवीगाळही केली. त्यामुळे या महिलेने ही बाब पतीला सांगितली. नेहमीचाच वाद असल्याने संतापलेल्या जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाºयाने घर गाठून शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाºयाची येथेच्छ धुलाई केली. कपडे फाटेपर्यंत या कर्मचाºयाला मारहाण झाली.

Web Title: Strong clash between two policemen in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.