शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

धर्मांतर थांबविण्यासाठी कठोर पावले उचलण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 11:59 IST

भारतीय सिंधू सभेची मागणी: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

जळगाव : पाकिस्तानातील सिंधी समाज संकटात असून सिंध प्रांतात मुलींचे अपहरण करून त्यांचा धर्म बळजबरीने बदलून त्यांच्याशी विवाह करणे आदी प्रकार होत आहेत. देशातही काही ठिकाणी हे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या घटना थांबवण्साठी कठोर पावले उचलावीत तसेच पाकिस्तान सरकारवरही यासाठी दबाव आणावा, अशी मागणी भारतीय सिंधू सभेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी हे निवेदन स्विकारले. त्यात म्हटले आहे की, भारतीय सिंधू सभा १९७९ पासून अखिल भारतीय स्तरावर कार्यरत आहे. ही संघटना सेवा, संघटन आणि उच्च मूल्याचे संस्कार या माध्यमातून सिंधी समाजात एकात्म भाव जपण्याचे, तो वृद्धिंगत करण्याचे काम करीत आहे. अखंड भारताच्या झालेल्या फाळणीत आपले सर्वस्व समर्पित करून सिंधी समाज आज भारतासह जगातील विविध भागात स्थिरावला आहे. या दरम्यान, सिंधी समाजाने आपल्यावरील सनातन धमार्चे पूवार्पार संस्कार जपले असून, त्यांना आपली ओळख बनवले आहे. परंतु, वर्तमानात पाकिस्तानातील सिंधी समाज संकटात आहे. तेथील काही तत्त्व समाजाची परंपरा छेदण्याचा प्रयत्न करीत आहेत. युवा पिढीची दिशाभूल करून त्यांचे धर्मांतर घडवून आणणे, मुलींचे अपहरण करून त्यांचा धर्म बळजबरीने बदलून त्यांच्याशी विवाह करणे आदी प्रकार होत आहेत. सिंध प्रांतात अशा घटनांची संख्या मोठी आहे.यामुळे पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समाजात भय आणि संतापाचे वातावरण आहे. भारतामधील काही वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या वृत्तांनुसार, ११ ते १५ वर्षे वयोगटातील हिंदू मुली अधिक संख्येने अशा घटनांच्या शिकार झाल्या असल्याचे आढळून आले आहे. पाकिस्तानच्या २० कोटी लोकसंख्येत हिंदू केवळ ३६ लाख आहेत. म्हणजेच १.६ टक्के. सन २०१८ ची ही आकडेवारी आहे.-भारतामध्येही काही भागात अशा घटना घडत असून, त्याबाबत भारत सरकारने गंभीर दखल घेऊन अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून योग्य ती कारवाई करावी अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.-शिष्टमंडळात सिंधी अकादमीचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ.गुरूमुख जगवाणी, माजी नगरसेवक राजकुमार अडवाणी, भारतीय सिंधू सभेचे जिल्हाध्यक्ष मनोहरलाल जाधवानी, शहराध्यक्ष डॉ.मुलचंद उदासी, डॉ.संजय हिराणी, रायसिंघानी आदींचा समावेश होता.-भारतीय सिंधू सभेची राष्ट्रीय चिंतन बैठक २७ व २८ जुलै रोजी, भोपाळ येथे झाली. देशभरातून ५१२ प्रतिनिधी उपस्थित होते.-भारतीय सिंधू सभेची राष्ट्रीय चिंतन बैठक २७ व २८ जुलै २०१९ रोजी, भोपाळ येथे झाली. यात देशभरातून ५१२ प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी धर्मांतरण आणि लव्ह जिहादच्या घटना थांबाव्यात यासाठी कठोर पावले उचलली जावीत.-अशा घटनांची पाकिस्तान सरकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई संबंधितांवर करावी.यावेळी धर्मांतरण आणि लव्ह जिहादच्या घटना थांबाव्यात यासाठी कठोर पावले उचलली जावीत. अशा घटनांची पाकिस्तान सरकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई संबंधितांवर करावी.- ज्यामुळे भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. त्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात यावा, असा ठराव करण्यात आला आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव