नवरात्रीच्या वर्गणीवरुन जळगावात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:34 IST2019-09-27T12:34:01+5:302019-09-27T12:34:34+5:30

जळगाव : नवरात्रोत्सवानिमित्त देवीची वर्गणीची पावती फाडण्याच्या कारणावरुन इच्छादेवी चौकात गुरुवारी रात्री आठ वाजता वाद झाला. त्यात तिघांनी बेदम ...

Stress in Jalgaon over Navratri subscription | नवरात्रीच्या वर्गणीवरुन जळगावात तणाव

नवरात्रीच्या वर्गणीवरुन जळगावात तणाव

जळगाव : नवरात्रोत्सवानिमित्त देवीची वर्गणीची पावती फाडण्याच्या कारणावरुन इच्छादेवी चौकात गुरुवारी रात्री आठ वाजता वाद झाला. त्यात तिघांनी बेदम मारहाण करुन संदीप सुरेश पाटील या चहा विक्रेत्याच्या डोक्यात बियरची बाटली मारली. त्यात संदीप रक्तबंबाळ झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे इच्छादेवी चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळवून सोन्या शिरसाठ याला ताब्यात घेण्यात आले आहे. भल्या तडवी व चेतन परदेशी दोघं जण फरार झाले आहेत. या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल व संदीप पाटील या दोन्ही भावांची इच्छा देवी चौकात चहाची टपरी आहे. सोन्या शिरसाठ, भल्या तडवी व चेतन परदेशी असे तिघं जण देवीची पावती फाडण्यासाठी राहूलकडे आले. त्याने ५०० रुपये दिले, या रकमेवर समाधान न झाल्याने या तिघांनी तीन हजार रुपये मागितले, ते देण्यास नकार दिला असता तिघांनी राहूल याला मारहाण करायला सुरुवात केली.
भांडण सोडविण्यासाठी आलेल्या संदीप याच्या डोक्यात एकाने बियरची बाटली मारली. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, नितीन पाटील, गोविंदा पाटील, किशोर पाटील, सचिन चौधरी व अतुल पाटील यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

Web Title: Stress in Jalgaon over Navratri subscription

टॅग्स :Jalgaonजळगाव