रावेर तालुक्यातील निंभोरा परिसरात वादळ, केळीचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 19:32 IST2020-06-10T19:31:01+5:302020-06-10T19:32:11+5:30

रावेर तालुक्यातील निंभोरा परिसरात चक्रीवादळासह पावसामुळे केळीचे लाखोंचे नुकसान झाले.

Storm in Nimbhora area of Raver taluka, loss of lakhs of bananas | रावेर तालुक्यातील निंभोरा परिसरात वादळ, केळीचे लाखोंचे नुकसान

रावेर तालुक्यातील निंभोरा परिसरात वादळ, केळीचे लाखोंचे नुकसान

ठळक मुद्देकेळीसह मोठमोठी झाडे, वीज तारांसह खांब वाकले१० ते १२ किलोमीटरच्या पट्ट्याते वादळ

निंभोरा बुद्रूक, ता.रावेर, जि.जळगाव : निंभोरा, वडगाव, विवरा, वाघोदा यासह चिनावल व कुंभारखेड्याच्या काही भागात आलेल्या जोरदार चक्रीवादळासह पावसामुळे १० ते १२ किलोमीटरच्या पट्ट्यात दुपारी दोनच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यासोबत पावसाने केळी उत्पादकांचे कंबरडे मोडले.
जोरदार चक्राकार वाºयामुळे वडगाव रस्ता, विवरा रस्ता तसेच बºहाणपूर- अंकलेश्वर रस्त्यावर मोठमोठी झाडेही जमीनदोस्त झाली. या पट्ट्यातील कापणीयोग्य असलेल्या टीश्युकल्चर रोपांसह केळी बागांचे मोठे नुकसान झाले. या पट्ट्यातील शेकडो एकर केळी बागा जमीनदोस्त झाल्या.
गेल्या आठवड्यात ३००ते ३५० रुपये दरावरून केळीचे बाजारभाव चांगल्याच तेजीत येण्याचे संकेत दिसत असताना तसेच ७०० ते ८०० रुपयांपर्यंत केळीची खरेदी सुरू झाली असताना झालेल्या या नुकसानाने या पट्ट्यातील केळी उत्पादक पुरते हादरले.
वारा इतक्या वेगात होता की, शेतातील मोठमोठी झाडे उन्मळून पडत विजतारा व वीज खांब वाºयाच्या वेगात आडवे झाले.
दरम्यान, १० ते १२ किलोमीटरच्या या पट्ट्यात हे वादळ झाले. या वादळात शेकडो शेतकऱ्यांची हजारो क्विंटल केळी कोटीच्या घरात नुकसान करून गेली. दरम्यान, या वादळाची नोंद घेत पंचनाम्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Storm in Nimbhora area of Raver taluka, loss of lakhs of bananas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.