परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 23:04 IST2021-03-11T23:04:18+5:302021-03-11T23:04:51+5:30
राज्य सेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्याने विद्यार्थ्यांनी गुरुवारी जिल्हा परिषद विश्रामगृहजवळ रस्ता रोको केला.

परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : राज्य सेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्याने विद्यार्थ्यांनी परिक्षा वेळेवर होण्यासाठी आज गुरुवारी जिल्हा परिषद विश्रामगृहजवळ रस्ता रोको केला.
गेल्या वर्षभरापासून काही न काही कारणावरून राज्य सेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत , अधिवेशन होतात , निवडणूका होतात , इतर परीक्षा होतात मग राज्य सेवा आयोगाच्या परीक्षा का पुढे ढकलल्या जात आहेत असा सवाल करत आज विद्यार्थ्यांनी सायंकाळी विश्रामगृहजवळ रस्ता रोको केला नायब तहसीलदार संतोष बावणे याना निवेदन देण्यात आले.
यावेळी शेखर खैरनार, राहुल माळी, सुशांत ढिवरे, प्रतिभा महाले, सपना विंचूरकर, सोनाली विंचूरकर, भाग्यश्री महाजन, जगदीश साळुंखे, आशिष बडगुजर, सागर साळी, निलेश पाटील, संग्रामसिंग पाटील, कमलेश महाजन, मयूर चौधरी, दर्शना सातपुते, दानेश रणधीर, विवेक पाटील, दामोदर पाटील, पवन लोहार हे उपोषणाला बसले होते.