भारनियमन विरोधात पाळधी येथे रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:35 IST2018-10-22T22:33:13+5:302018-10-22T22:35:44+5:30

पाळधी सह परिसरात भारनियम सुरु झाल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी संध्याकाळी ७ .३० वा रास्ता रोको आंदोलन केले

Stop the road at the palanquin against the lodsheding | भारनियमन विरोधात पाळधी येथे रस्ता रोको

भारनियमन विरोधात पाळधी येथे रस्ता रोको

ठळक मुद्देदुर्गोत्सव संपल्यानंतर भारनियमन सुरु केल्याने संतापऔरंगाबाद मार्गावर दोन तास रास्ता रोकोसाहाय्यक पोलीस निरीक्षकांना ग्रामस्थांचा घेराव

पाळधी ता जामनेर : पाळधी सह परिसरात भारनियम सुरु झाल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी संध्याकाळी ७ .३० वा रास्ता रोको आंदोलन केले
पाळधी परिसरात पहाटे पाच ते दुपारी दोन तर सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजे पर्यंत भारनियमन केले जात आहे. सोमवारी संतप्त ग्रामस्थांनी जळगाव औरंगाबाद महामार्गावर रस्त्यावर उतरून टायर जाळले व रास्ता रोको आंदोलन केले. संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी वीज येईपर्यंत तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. वीज आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. घटनास्थळी पहुर पोलीस स्टेशनचे सपोनि डी.के.शिरसाठ व त्यांचे पोलीस कर्मचारी दाखल झाले. ग्रामस्थांनी डी.के.शिरसाठ यांना घेराव घातला.

Web Title: Stop the road at the palanquin against the lodsheding